महाभारतामध्ये पांडवांच्या गैरहजेरीत अभिमन्यूने कौरवांची दाणादाण उडवली. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वथामा, महारथी कर्ण, दुर्योधन, दुशासन असे रथी महारथी अभिमन्युसमोर निष्प्रभ ठरले.
१९९० च्या दशकात देशातील औषधी क्षेत्रातही असंच महाभारत घडलं. अभिमन्यूच्या जागी होता एक सामान्य माणूस आणि समोर होत्या ग्लाक्सो, संडोज, फायझर, अबट, नोवार्टीस अशा अनेक मल्टीनशनल कंपन्या. त्यांच्याशी टक्कर घेणं म्हणजे कपाळमोक्ष करून घेण्यासारखंच होतं. पण त्याच्यासमोर होतं एक निश्च्छित ध्येय. त्याच्यामद्धे होता प्रचंड आत्मविश्वास. आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर डॉक्टर अंजी रेड्डी नावाच्या त्या सामान्य माणसाने पुढे इतिहास घडवला. त्याच्या " डॉक्टर रेड्डीज ल्याब." कंपनीने वरील सर्व कंपन्यांच्या नाकात दम आणला. औषध क्षेत्रात त्याच्या कंपनीने अशी जोरदार मुसंडी मारली कि आज ३० वर्षानंतर वरील सर्व कंपनींच्या देशातील एकत्रित विक्रीपेक्षा आणि नफ्यापेक्षा एकट्या डॉक्टर रेड्डीज ल्याबची विक्री अधिक आहे. आज ४६६०० कोटी बाजारमुल्य असलेल्या आणि दरवर्षी तब्बल साडेआठ हजार कोटीची विक्री करून साडे बाराशे कोटी नफा कमावणाऱ्या डॉक्टर अंजी रेड्डींच्या अफाट कर्तुत्वाला माझा त्रिवार सलाम !
सरकारी कंपनीत नोकरी करणाऱ्या चाळीशीतल्या एका कर्मचार्याने स्वतःची औषधी कंपनी काढायचं एक भव्य स्वप्न उराशी बाळगून नोकरी सोडली. तेव्हा घरातील लोकांनी, नातेवाइकानी आणि मित्रांनीही त्याला वेड्यात काढलं. त्याने चक्क मल्टी नशनल कंपनींच्या वर्चस्वालाच आव्हान द्यायचा विडा उचलला. तेव्हा औषधी क्षेत्रात ग्लाक्सो, संडोज, फायझर, अबट, नोवार्टीस अशा परदेशी कंपन्यांचीच दादागिरी होती. त्यांच्या महागड्या औषधांना पर्याय म्हणून त्याने मोठ्या प्रमाणावर रिसर्च करून आणलेली कमी किमतीची औषधे तडाखेबंद विक्री करू लागली.
विजयवाडाजवळील एका छोट्याशा गावातला मुलगा बीएससी झाला. अभ्यासात तो हुशार होता म्हणून त्याने पुढे आणखीही शिक्षण घेतलं. आणि नंतर त्याने केमिकल इंजीनिअरिंगमध्ये पीएच डी मिळवली. लवकरच त्याला एका सरकारी कंपनीत नोकरीही मिळाली. तिथला तो रुक्ष कारभार अन बेशिस्तपणा पाहून त्याचं तिथे मन रमेना. आपण इतकीच मेहनत स्वतःचा व्यवसाय काढून केली तर आपण कित्येक पटीने जास्त कमाई करू शकू हा विचार मनात घेऊनच त्याने नोकरीचा राजीनामा दिला. १९८० मध्ये त्याने भागीदारीत पहिली कंपनी स्थापन केली. पण भागीदाराच्या कामातील हस्त क्षेपामुळे त्यांनी ती कंपनी सोडली. पुन्हा त्यांनी दुसर्या भागीदाराला घेऊन नवीन कंपनी स्थापन केली. त्यांची कंपनी तुफान चालली होती. पण भागीदारांनी इतर व्यवसायही करायचा निर्णय घेतलं, जो त्यांना मान्य नव्हता. त्यांना औषध क्षेत्रातच भरीव कार्य करायचे होते. म्हणून पुन्हा त्यांनी दुसरी कंपनीही सोडली.
तोपर्यंत त्यांनी २५ लाख रुपये कमावले होते. त्या भांडवलाच्या बळावर त्यांनी १९८४ मध्ये " डॉक्टर रेड्डीज ल्याब" ची स्थापना केली. १९८६ मध्ये त्यांच्या कंपनीसमोर आर्थिक संकट उभं राहिलं. बँकाकाढून कर्ज काढण्याऐवजी त्यांनी अडीच कोटीचा आयपीओ बाजारात आणला. इतरांनी शोधलेल्या फोर्मुल्यांवर आधारित औषधे बनविण्यापेक्षा स्वतः संशोधन केलेली औषधे बाजारात आणण्यावर त्यांनी भर दिला. २००१ मध्ये न्युयोर्क स्टोक एक्स्चेंज आणि नाश्डक स्टोक एक्स्चेंजमध्ये नोंद करणारी औषधी क्षेत्रातली आशियातील त्यांची पहिली कंपनी ठरली. पुढे त्यांनी युरोपमधून जीडीआर जारी करून पाच कोटी डॉलर म्हणजे ३०० कोटी रुपये जमवले. त्यानंतर एडीआर मधून १३ कोटी डॉलर म्हणजे ७८० कोटी रुपये उभे केले. त्यापैकी निव्वळ शंभर कोटी रुपये त्यांनी संशोधनावर खर्च केले. आज देशातील सन फार्मा, सिपला, वाकहार्ड, रणबक्षी, इत्यादी नामवंत कंपन्यानाही त्यांनी विक्रीमध्ये मागे टाकलंय.
एकदा यशस्वी झाल्यावर डॉक्टर अंजी रेड्डीनी " रेड्डी फौंडेशनची " स्थापना केली. तळागाळातील ५० लाख मुलांच्या शिक्षणासाठी आणि उत्कर्षासाठी त्यांनी अफाट खर्च केला. तरुणांनी औषध क्षेत्राकडे वळाव म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी वर्ग सुरु केले. दुर्दैवाने १५ मार्च १०१३ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचे कॅन्सरने निधन झाले.
Rajesh Borkar
9765005123
Good
ReplyDelete