नाव : लॅक्मे
स्थापना: १९५२
संस्थापक : जे आर डी टाटा
सध्या मालकी : हिंदुस्थान युनि लिवर
महिलांमध्ये प्रसिद्ध असलेला लॅक्मे हा कॉस्मेटिक ब्रँड भारतीय आहे. विशेष म्हणजे टाटा समूहाचा हा ब्रँड आहे. साधरण १९५२ मध्ये या हा ब्रँड स्थापन करण्यात आला. असे म्हणतात की जवाहर लाल नेहरू यांनी जेआरडी टाटा यांना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पन्न भारतात घेण्याची विनंती केली होती. त्याकाळी विदेशी सौंदर्यप्रसाधनांनवर भारतीय महिला खूप खर्च करत होत्या त्यामुळे त्यांनी स्वदेशी सौंदर्यप्रसाधनांवर भर देत लॅक्मे ही कंपनी सुरू केली.